फेडरल रिझव्र्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी अमेरिकेची मध्यवर्ती बँक या महिन्यापासून व्याजदर वाढीची गती कमी करू शकते, असे सांगितल्यानंतर आज भारतातील सोन्याचे दर वाढले आहेत.
लग्नसराईच्या मुहूर्तावर सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांचं बजेट कोलमडलं आहे.
सोन्याच्या दरात 500 रूपयांची वाढ होऊन आज 24 कॅरेट सोन्याचा दर 53,770 रूपयांनी व्यवहार करत आहे.
जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत झालेली वाढ आणि त्याचा परिणाम म्हणून जगभरात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून जळगावच्या सुवर्णनगरीतही दर वाढले आहेत.
पंधरा दिवसांपूर्वी सोन्याचे दर 52,000 हजारांवर स्थिर होते. आज मात्र 53,800 इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले आहे.
त्याचा परिणाम ग्राहकांवर झाला असून वाढत्या किमती पाहता ज्यांना आवश्यकच आहे तेच ग्राहक सोने खरेदी करताना दिसतायत.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. स्पॉट गोल्ड $ 24.58 ने वाढून $ 1,798.05 प्रति औंस वर आहे.
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.
BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.