आंतरराष्ट्रीय बाजारात व्याजदराचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरावर देखील पडला आहे. यामुळे सोन्याच्या दराने उच्चांक पातळी गाठली आहे. भारतात लगन्सराईचे दिवस सुरु असताना सोन्याच्या दरात झालेली ही वाढ ग्राहकांसाठी फारच खर्चिक झाली आहे. ऐन लग्नसराईत ग्राहकांनी मौल्यवान धातूंची खरेदी करण्याकडे पाठ फिरवली आहे. तर, सोन्याच्या वाढलेल्या दरामुळे काही ग्राहकांनी वेट अॅन्ड वॉचची भूमिकादेखील घेतली आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.55 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 53,820 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 66,230 रुपयांनी व्यवहार करत आहे. सोन्याचे हे वाढलेले दर मुंबई, पुण्यासह, नाशिक, नागपूर, आणि कोलकत्तामध्येही सारखेच आहेत. त्यामुळे ग्राहकांसाठी एक प्रकारे ही चिंतेची बाब आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. स्पॉट गोल्ड $ 24.58 ने वाढून $ 1,798.05 प्रति औंस वर आहे. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.