भारतीय शेअर बाजारात आजही तेजी दिसून येत आहे
सेन्सेक्स (Sensex), निफ्टी (Nifty) निर्देशांक वधारले आहेत. बँक निफ्टीने ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठताना 44000 अंकांचा टप्पा ओलांडला
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 186 अंकांच्या तेजीसह 62,719 अंकांवर खुला
निफ्टी 51 अंकांच्या तेजीसह 18,659 अंकांवर खुला
सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 260 अंकांच्या तेजीसह 62,793.54 अंकांवर व्यवहार करत होता
निफ्टी निर्देशांक 77 अंकांच्या तेजीसह 18,685.90 अंकांवर व्यवहार करत होता
निफ्टी 50 निर्देशांकातील 41 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसत असून 9 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे
सेन्सेक्समधील 30 पैकी 23 कंपन्यांच्या शेअर दरात खरेदीचा जोर दिसत आहेत
सात कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.
आयटी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे