आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ तर 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे तर चांदीच्या किंमतीत काय बदल आहेत? आज सकाळी जाहीर झालेल्या सोने दरानुसार, 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीमध्ये 100 रुपयांची वाढ झाली आहे. 22 कॅरेट सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचे दर 54,600 रुपये प्रति तोळा आहेत 22 कॅरेट सोने खरेदीसाठी ग्राहकांना 50,040 रुपये प्रति तोळा खर्च करावे लागतील. चांदीच्या किंमती आज 68,200 रुपये प्रति किलो नोंदवण्यात आली आहेत. कालच्या तुलनेत त्यात 100 रुपयांची वाढ झाली आहे जागतिक बाजारात, सोने 9.59 डॉलरने घसरून $1,787.70 प्रति औंसवर व्यवहार करत होते. चांदी प्रति औंस $ 0.18 ने घसरले आहे आणि $ 23.30 प्रति औंस आहे. तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.