आज भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात तेजीसह झाली
जागतिक शेअर बाजारात सकारात्मक वातावरण दिसून आल्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला.
अमेरिकन शेअर बाजार तेजीत बंद झाला. तर, आशियाई शेअर बाजारातही तेजी दिसून आली.
भारतीय शेअर बाजारात सुरुवातीच्या व्यवहारात तेजी दिसत आहे.
मागील काही दिवसांपासून विक्रीचा जोर दिसत असलेल्या आयटी सेक्टरमध्ये आज खरेदीचा जोर दिसत आहे
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 113 अंकांनी वधारता 62,243 वर तर निफ्टी 35 अंकांनी वधारत 18532 अंकांवर खुला झाला
सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 60 अंकांच्या तेजीसह 62,190.88 अंकांवर व्यवहार करत होता.
निफ्टी 20 अंकांच्या तेजीसह 18,518.10 अंकांवर व्यवहार करत आहे.
आयटी सेक्टरमध्ये खरेदीचा जोर
शेअर बाजारात तेजीसह सुरुवात,