सोन्या-चांदीच्या दरात या आठवड्यात मात्र, घसरण सुरु झाली आहे.

जागतिक बाजारातील चलनवाढीची आकडेवारी आणि फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक निर्णयापूर्वी गुंतवणूकदारांनी सोने-चांदी खरेदी करणे टाळले होते.

कालच्या तुलनेत आज सोन्याचे दर 200 रूपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना सोने खरेदीसाठी थोडासा दिलासा मिळाला आहे.

आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.30 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 54,220 रूपयांवर आला आहे.

भारतीय बाजारात एक किलो चांदीचा दर 68,030 रुपयांवर व्यवहार करत आहे.

जागतिक बाजारात स्पॉट सिल्व्हर 0.6% वाढून $23.44 वर, प्लॅटिनम 0.4% वाढून $1,005.88 वर आणि पॅलेडियम 0.1% वाढून $1,889.50 वर पोहोचले.

स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% वाढून $1,785.78 प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.3% वाढून $1,796.50 वर होते.

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.

BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता.