टॉप 1

भारतीय शेअर बाजाराने बुधवारी ऐतिहासिक उसळण घेतल्यानंतर आजही बाजारात खरेदीचा जोर दिसत आहे

टॉप 2

सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकाने आतापर्यंतचा उच्चांक गाठला

टॉप 3

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 367 अंकांच्या तेजीसह 63,467 अंकांवर खुला

टॉप 4

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 113 अंकांनी वधारत 18,871 अंकांवर खुला

टॉप 5

अमेरिकन शेअर बाजार वधारत बंद झाला

टॉप 6

आशियाई शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे.

टॉप 7

शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर खरेदीचा जोर दिसून येत होता

टॉप 8

गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या खरेदीमुळे सेन्सेक्सने 63500 अंकांचा टप्पा ओलांडला

टॉप 9

निफ्टी निर्देशांकाने 18,887 अंकांचा टप्पा गाठला

टॉप 10

सकाळी 10.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 266 अंकांनी वधारत 63,366.41 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 75 अंकांच्या तेजीसह 18,833.55 अंकांवर व्यवहार करत होता.