भारतीय शेअर बाजारात आज ऐतिहासिक पल्ला गाठला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 63000 अंकांचा पल्ला गाठला
मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात तुफान खरेदीमुळे तेजी दिसून येत होती.
आज मात्र, सेन्सेक्सने ऐतिहासिक टप्पा पार केला.
सलग सात सत्रांपासून बाजारात तेजी दिसून येत आहे.
आज बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा सेन्सेक्स निर्देशांक 417.81 अंकांच्या तेजीसह 63,099.65 अंकांवर स्थिरावला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 140.30 अंकांनी वधारत 18,758.30 अंकांवर बंद झाला.
आज बाजारात व्यवहार झालेल्या कंपन्यांपैकी 1992 कंपन्यांचे शेअर दर वधारले होते.
1395 कंपन्यांचे शेअर दर घसरले. 104 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.