जागतिक बाजारपेठेचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही दिसून आला आहे. गेल्या काही दिवसांपासून 24 कॅरेट सोन्याचा दर 52 हजारांवर पोहोचला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर आज 48 हजारांवर व्यवहार करत आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.35 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52,930 रूपयांवर आला आहे. आज एक किलो चांदीचा दर 62,550 रुपयांवर पोहोचला आहे. मुंबईसह, पुणे, नाशिक, नागपूर आणि कोलकातामध्ये देखील सोन्याचे दर काही अंशी सारखेच आहेत. राजधानी दिल्लीतही सोन्याचे दर 52 हजारांच्या घरात व्यवहार करत आहेत. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता.