सेन्सेक्स आज 310 अंकांनी घसरला तर निफ्टीमध्ये 82 अंकांची घसरण झाली. आज 865 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1462 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. आज Adani Ports, Bajaj Finance, NTPC कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. Shree Cements, Hindalco Industries यांच्या निफ्टीमध्ये घट झाली. रिअॅलिटी आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या शेअर्समध्ये 1-2 टक्क्यांची वाढ झाली. आयटी, फार्मा, बँक,ऑटो क्षेत्रातल्या शेअर्समध्ये विक्री झाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये काहीशी घट झाल्याचं दिसून आलं. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ही 79.88 इतकी आहे. बाजार सुरु झाला त्यावेळी शेअर बाजारात तेजी होती. त्यानंतर बाजारात घसरण झाली.