भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या पडझडीने झाली आहे.
बाजारातील व्यवहार सुरू होताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला
प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्समध्ये 1200 अंकांची घसरण झाली
तर, निफ्टीमध्ये 370 अंकांची घसरण दिसून आली
सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 1069 अंकांच्या घसरणीसह 57,753.61 अंकांवर व्यवहार करत होता
निफ्टी 314 अंकांच्या घसरणीसह 17,244.45 अंकांवर व्यवहार करत होता
निफ्टीतील स्मॉलकॅप 100, निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांकात दोन टक्क्यांची घसरण दिसून आली
निफ्टी आयटी, सार्वजनिक क्षेत्रातील बँक, रियल्टी या सेक्टरमध्ये घसरण दिसून आली
आयटी निर्देशांकात 4.20 टक्क्यांची घसरण दिसून आली.
तर, पीएसयू बँक निर्देशांकात 2.51 टक्के णि मेटलमध्ये 2.44 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे