शेअर बाजारातील (Share Market) आजचा दिवस काहीसा अस्थिरतेचा असल्याचं दिसून आलं
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) आज 54 अंकांची वाढ झाली
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 27 अंकांची वाढ झाली
सेन्सेक्समध्ये आज 0.09 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,085 वर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.16 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,605 वर स्थिरावला
बँक निफ्टीमध्ये 340 अंकांची वाढ आज शेअर बाजारात 2076 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
तर 1259 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली
तसेच आज 131 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही
आज शेअर बाजार बंद होताना Apollo Hospitals, IndusInd Bank, ONGC, NTPC आणि ICICI Bank या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली
BPCL, Tata Steel, Divis Laboratories, Sun Pharma आणि TCS कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली
मंगळवारच्या तुलनेत आज रुपयाची किंमत सात पैशांनी वधारल्याचं दिसून आलं