शेअर बाजारात आजही विक्रीचा दबाव असल्याचे चित्र आहे.
बाजारात सुरुवातीला मुंबई शेअर बाजाराचा निर्देकांक सेन्सेक्स 177.98 अंकांच्या घसरणीसह 58,853 अंकांवर खुला
निफ्टी निर्देशांक 52.05 अंकांच्या घसरणीसह 17525 अंकांवर खुला
सेन्सेक्समधील 30 पैकी 7 शेअर्समध्ये तेजी असल्याचे दिसत आहे
23 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे तर, निफ्टीतील 50 पैकी 16 शेअरमध्ये तेजी
बँक निफ्टीतही 20 अंकांची घसरण दिसून येत आहे
बँक निफ्टी 38677 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत आहे
आज शेअर बाजारात इंडजसइंड बँक, आयटीसी, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एनटीपीसीच्या शेअरमध्ये जोर दिसत आहे.
सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक 152 अंकांच्या घसरणीसह 58,878.53 अंकांवर व्यवहार करत होता
निफ्टी निर्देशांक 40 अंकाच्या घसरणीसह 17,536.90 अंकांवर व्यवहार करत होता.