गेले दोन दिवस बाजारात सुरू असलेल्या पडझडीला लगाम लागला आहे.
आजही शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. मात्र, काही वेळानंतर बाजार सावरण्यास सुरुवात झाली
सेन्सेक्स 567 अंकांच्या घसरणीसह 58,205 अंकांवर खुला झाला
तर, निफ्टी निर्देशांक 133.35 अंकांच्या घसरणीसह 17,357.35 अंकांवर खुला झाला होता
सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक 10 अंकांनी वधारत 58,784.46 अंकांवर व्यवहार करत होता
निफ्टी निर्देशांक 2.75 अंकांनी वधारत 17,493.45 अंकांवर व्यवहार करत होता
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 17 शेअरमध्ये तेजी दिसून आली
तर, 13 शेअरमध्ये घसरण दिसली. तर, निफ्टी 50 मधील 30 शेअर्समध्ये खरेदीचा जोर दिसला
निफ्टी बँकमध्येही तेजी दिसून आली. बँक निफ्टीने 38,000 अंकांची पातळी ओलांडली.
निफ्टीमध्ये बँक, आयटी आणि रियल्टी सेक्टर वगळता इतर सर्व सेक्टरमध्ये तेजी दिसून आली आहे