शेअर बाजारातील आठवड्याची सुरुवात मोठ्या घसरणीने झाली असून गुंतवणूकदारांना मोठं नुकसान सहन करावं लागलंय.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 872 अंकांची घसरण
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 267 अंकांची घसरण
सेन्सेक्समध्ये आज 1.46 टक्क्यांची घसरण झाली असून तो 58,773 अंकांवर पोहोचला
निफ्टीमध्ये 1.51 टक्क्यांची घसरण झाली असून तो 17,490 अंकांवर पोहोचला
बँक निफ्टीमध्येही 688 अंकांची घसरण झाली असून तो 38,297 अंकांवर पोहोचला
आज शेअर बाजारामध्ये 1228 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 2214 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट
आज 163 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही
आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचं मात्र मोठं नुकसान झाल्याचं दिसून येतंय
आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली