आज भारतीय शेअर बाजार किंचित तेजीसह व्यवहार सुरू झाले.
BSE सेन्सेक्स 10 अंकांच्या वाढीसह 60,115 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 7 अंकांच्या वाढीसह 17,902 अंकांवर उघडला.
सध्या सेन्सेक्स 33 आणि निफ्टी 22 अंकांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.
आज शेअर बाजारात आयटी शेअर्सच्या खरेदीवर गुंतवणूकदारांचा जोर पाहायला मिळत आहे.
तसेच ऑटो, बँकिंग, पीएसयू बँक एनर्जी, इन्फ्रा सेक्टरच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे.
फार्मा, एनर्जी एफएमसीजी, मेटल सेक्टरच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे.
मिडकॅप आणि स्मॉलकॅपच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली आहे.
बजाज फिनसर्व 0.69 टक्के, नेस्ले 0.62 टक्के, विप्रो 0.60 टक्क्यांच्या तेजी व्यवहार करत आहेत.
SBI 0.30 टक्क्यांनी, पॉवर ग्रिड 0.19 टक्क्यांनी घसरल्याचे पाहायला मिळत आहे.
आज डिसेंबर महिन्यातील किरकोळ महागाईचे आकडे जाहीर केले जाणार आहेत.