भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर देशातील सरकारी तेल कंपन्या ठरवतात.

दररोज सकाळी 6 वाजता राज्य आणि शहरांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारे या किमती निश्चित केल्या जातात.

बुधवारी म्हणजेच, 11 जानेवारी 2023 रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट नोंदवली गेली.

आज, WTI क्रूड ऑईलची किंमत 0.51 टक्क्यांनी घसरली असून ती प्रति बॅरल 74.74 डॉलरवर पोहोचलीये.

ब्रेंट क्रूड ऑईलबद्दल बोलायचं झालं तर, त्याची किंमत 0.47 टक्क्यांनी घसरली असून ती प्रति बॅरल 79.72 डॉलरवर पोहोचलीये.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरुनही देशातील इंधनदर स्थिर आहेत

मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे

पुणे पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय

कोल्हापुरात पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 93.01 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय

नाशकात पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 93.27 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय