आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सतत चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळतंय मात्र देशांतर्गत बाजारातील इंधन दरांवर होताना दिसत नाही. गुरुवारी म्हणजेच, 12 जानेवारी 2022 रोजी आज कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ झालीये. ब्रेंट क्रूड ऑईलबद्दल बोलायचं झालं तर, त्याची किंमत 3.21 टक्क्यांनी वाढलीये. डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलच्या किंमतींत 0.18 टक्क्यांनी वाढली असून प्रति बॅरल 77.55 डॉलरवर पोहोचलीये देशातील प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरच आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त दरानं पेट्रोल परभणीत विकलं जातंय परभणीत 109.45 रुपये प्रति लिटरनं पेट्रोल विकलं जातंय