मंगळवारच्या घसरणीनंतर आज (11 जानेवारी 2023) शेअर बाजार आज सावरल्याचे चित्र होते. बाजारात दिसून आलेल्या अस्थिरतेमुळे सेन्सेक्स, निफ्टी घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 9.98 अंकांच्या घसरणीसह 60,105.50 अंकांवर स्थिरावला. निफ्टी 18.50 अंकांच्या घसरणीसह 17,895.70 अंकांवर बंद झाला. 1830 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 1566 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. भारती एअरटेल, सिप्ला, डिव्हीज लॅब, अपोलो हॉस्पिटल आणि एचयूएल आदी कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत आज रुपया 21 पैशांनी वधारत 81.57 वर बंद झाला. हिंदाल्को, सन फार्मा, बीपीसीएल, अल्ट्राटेक सिमेंट आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर दरात तेजी दिसून आली. बँक निफ्टी 217.95 अंकांनी वधारत 42,232.70 अंकांवर स्थिरावला.