नवीन वर्षातील पहिलाच सण असल्यामुळे महिला वर्गात सोने खरेदीसाठी प्रचंड उत्सुकता पाहायला मिळतेय. वर्षाच्या सुरुवातीलाच चीनमधील वाढता कोरोना संसर्ग आणि जागतिक डॉलरच्या संख्येत झालेली वाढ यामुळे भारतात या मौल्यवान धातूंच्या किंमती वाढताना दिसतात. कालच्या तुलनेत आज सोन्या-चांदीच्या किंमतीत फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे ग्राहक सोने खरेदी करू शकतात. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.30 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 55,960 रूपयांवर आला आहे. एक किलो चांदीचा दर 68,970 रुपयांवर व्यवहार करत आहे. लग्नसराईत सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते पण वाढलेल्या दरामुळे ग्राहकांना सोनं खरेदीसाठी मुरड घालावी लागतेय. स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% वाढून $1,785.78 प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.7% कमी होऊन $1,796.50 वर होते. स्पॉट सिल्व्हर 0.9% कमी होऊन $23.44 वर, प्लॅटिनम 0.4% कमी होऊन $1,005.88 वर आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन $1,889.50 वर पोहोचले आहेत. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. सोन्याचे दर तपासण्यासाठी तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.