आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी आज शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली आहे
निफ्टी बँक आणि आयटी क्षेत्रात घसरणीमुळे शेअर बाजार घसरला
आज मेटल्स आणि वाहनांच्या मार्केटमध्ये काहीशी उसळी पाहायला मिळाली मात्र ही उसळी बाजाराला वर आणण्यात यशस्वी ठरली नाही
आज मार्केटच्या ओपनिंगला बीएसई 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 114.54 अंकांच्या किंवा 0.19 टक्क्यांच्या घसरणीसह 59,005 वर उघडला
दुसरीकडे, NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 35.95 अंक किंवा 0.20 टक्क्यांच्या कमजोरीसह 17,593 वर उघडला
व्यवसाय सुरू झाल्यानंतर पहिल्या 10 मिनिटांतच बाजार घसरत सेन्सेक्स 59,000 च्या खाली घसरला
सेन्सेक्स 269.57 अंकांनी घसरून 58,850 वर आला आहे. निफ्टी 75 अंकांनी घसरून 17,554 च्या पातळीवर आला
आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी आज सेन्सेक्समधील 30 पैकी 7 शेअर्स वाढले
23 शेअर्स घसरल्याचं पाहायला मिळालं आहे
निफ्टीच्या 50 पैकी 15 शेअर्स घसरले आहेत आणि वाढणाऱ्या शेअर्सशी संख्या 35 आहे