अमेरिकन बाजाराच्या मागील शानदार क्लोजिंगनंतर आज आशियाई बाजारात तेजी पाहायला मिळत आहे.
आठवड्याच्या पहिल्या दिवसाची सुरुवात भारतीय शेअर बाजारासाठी चांगली ठरणार आहे.
आज शेअर बाजार सुरुवातीच्या सत्रात तेजीत असल्याचं पाहायला मिळालं.
बीएसईचा 30 शेअर्सचा इंडेक्स सेन्सेक्स 246.70 अंकांच्या म्हणजेच,
0.41 टक्क्यांच्या वाढीसह 60,147.07 वर उघडला.
दुसरीकडे, NSE चा 50 शेअर्सचा इंडेक्स निफ्टी आज 93.10 अंकांच्या म्हणजेच,
0.52 टक्क्यांच्या वाढीसह 17,952.55 वर उघडला.
आज शेअर मार्केटमध्ये, सेन्सेक्सच्या 30 पैकी 28 शेअर्समध्ये वाढ होत आहे
त्यातील 2 शेअर्स घसरल्याचं पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे, निफ्टीच्या 50 पैकी 47 शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे