मागच्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर जे कमी-जास्त होत होते. आज या दरात पुन्हा 500 रूपयांनी वाढ झाली आहे.

त्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही.

कमॉडिटी मार्केट तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चीनमधील कोरोनाचा वाढता संसर्ग, डॉलरच्या संख्येत झालेली वाढ आणि जागतिक आर्थिक मंदीची भीती या कारणांमुळे सोन्या-चांदीचे दर सातत्याने वाढतायत.

आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 55,820 रूपयांवर आला आहे.

आज एक किलो चांदीचा दर 69,140 रुपयांवर व्यवहार करत आहे.

जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याची स्पॉट किंमत 0.35 टक्क्यांनी वाढून $1,689.01 प्रति औंस झाली.

सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीची स्पॉट किंमत आज 1.86 टक्क्यांनी वाढून 19.76 डॉलर प्रति औंस झाली आहे.

BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.

तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.