भारतीय तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर इंधन दरांमध्ये तेल कंपन्यांनी कोणताही बदल केलेला नाही. देशात तब्बल सात महिन्यांहून अधिक काळापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत घट आंतरराष्ट्रीय बाजारात आज WTI क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल 73.77 डॉलरवर पोहोचली आंतरराष्ट्रीय बाजारात आज ब्रेंट क्रूड ऑईल 78.57 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलंय कच्च्या तेलाच्या किमतींच्या घसरणीमुळे तेल कंपन्यांना प्रत्येक लिटर पेट्रोलवर 10 रुपये नफा मिळतोय डिझेलवर मात्र, तेल कंपन्यांना प्रतिलिटर 6.5 रुपये तोटा सहन करावा लागतोय. आज मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय