ज्यांचा पगार टॅक्स स्लॅबमध्ये येतो, त्यांनी आपल्या कराचं नियोजन करावं.

किमान तीन ते चार महिने आधीच कर नियोजन (Tax Saving) सुरु करण्याचा प्रयत्न करा.

अशा अनेक योजना आहेत ज्यात गुंतवणूक करुन तुम्हाला आयकराच्या विविध कलमांतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो.

जाणून घेऊया पाच कर बचत योजनांबद्दल ज्यामध्‍ये गुंतवणूक केल्‍याने मोठ्या परताव्यासह कर बचतीचा लाभ मिळतो.

PPF योजनेवर 7.10 टक्के व्याज मिळतं. शिवाय आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळते.

NPS योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्ही जास्तीत जास्त एकूण 2 लाख रुपयांची सूट मिळवू शकता.

Post Office Term Deposit Scheme मध्ये टक्के 7 व्याज मिळणार आहे. तर आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळेल.

VPF योजनेत 8.10 टक्के दराने परतावा मिळतो. तसंच आयकराच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळवू शकता.

ELSS म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यानंतर आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळते.