आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर दिसला.
खरेदीचा जोर असल्याने शेअर बाजारात आज तेजी दिसून आली.
सेन्सेक्सने (Sensex) पुन्हा एकदा 59, 000 अंकांचा टप्पा ओलांडला.
आज बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 442 अंकांच्या तेजीसह 59,245 अंकांवर
नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक (NSE) निफ्टीमध्ये (NIFTY) 126 अंकांची तेजी दिसून आली
निफ्टी 17,665 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टीतही सर्व 12 स्टॉक्समध्ये तेजी दिसली
शेअर बाजारातील सगळ्याच सेक्टरमध्ये आज तेजी दिसून आली
बँकिंग, आयटी, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, एनर्जी, मेटल्स, ग्राहकोपयोगी वस्तू, ऑइल अॅण्ड गॅस शिवाय मीडिया सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसला
मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्येही तेजी दिसून आली
निफ्टीतील 50 पैकी 35 स्टॉक्सच्या शेअर दरात तेजी दिसून आली