भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी खरेदीचा जोर दिसून आला
गुंतवणूकदारांकडून झालेल्या खरेदीमुळे निफ्टीने पुन्हा एकदा 18 हजार अंकांचा टप्पा गाठला
एप्रिल महिन्यात निफ्टीने हा टप्पा गाठला होता. मात्र, त्यानंतर निर्देशांकात घसरण झाली होती
आज शेअर बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्स 451 अंकांच्या तेजीसह 60,566 अंकांवर स्थिरावला
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 130 अंकांच्या तेजीसह 18, 070 अंकांवर बंद झाला
आज शेअर बाजारात 1858 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली
634 कंपन्यांचे दर घसरले. बाजारात सूचीबद्ध असलेल्या 108 शेअर दरात कोणताही बदल झाला नाही
आज दिवसभरातील व्यवहारात 337 कंपन्यांच्या शेअर दराला अप्पर सर्किट लागला
154 कंपन्यांच्या शेअर दराला लोअर सर्किट लागले. आज दिवसभरात शेअर बाजाराचे बाजार भांडवल 286.72 लाख कोटी रुपये इतके झाले
आज टाटा कंझ्युमरच्या शेअर दरात 2.85 टक्क्यांनी वाढ झाली