या आठवड्यात सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला
दिवाळी आधी गुंतवणूकदारांकडून खरेदी सुरू आहे
बँकिंग, एफएमसीजी सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसून आला
गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 146 अंकांनी वधारत 59,107 अंकांवर स्थिरावला
तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 30 अंकांच्या तेजीसह 17,516 अंकांवर बंद झाला.
बाजारात आज तेजी दिसून आली असली तरी विक्रीचा जोर दिसून आला
बाजारात आज विक्रीचा जोर दिसून आलेल्या कंपन्यांची संख्या अधिक दिसून आली
आज बाजारात सूचीबद्ध असलेल्या 3671 कंपन्यांपैकी 1652 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली
1761 शेअर दरात घसरण दिसून आली
158 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही