Gold Silver Rate : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे.



त्यामुळे बाजारात ग्राहकांची सोनं खरेदीसाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळतेय.



दिवाळीत अनेक नवीन वस्तू, तसेच सोनं-चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे.



दिवाळीत लक्ष्मीपूजन, धनत्रयोदशी, दिवाळी पाडवा या प्रमुख सणांच्या दिवशी सोनं खरेदी केले जाते.



त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक बाजारपेठांत ग्राहकांचा खरेदीसाठी उत्साह पाहायला मिळतोय.



भारतीय ग्राहक सोनं-चांदीकडे गुंतवणुकीचा पर्याय म्हणून देखील सोनं खरेदी करतात.



सोन्याच्या किंमतीत सतत चढ-उतार पाहायला मिळतो. त्यामुळे गुंतवणूक हा एक ग्राहकांसाठी उत्तम पर्याय आहे.