टॉप 1

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात चांगलीच तेजी दिसून आल्याने गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाला

टॉप 2

आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 786 अंकांनी वधारला

टॉप 3

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 225 अंकांनी वधारला

टॉप 4

सेन्सेक्समध्ये आज 1.31 टक्क्यांची वाढ होऊन तो 60,746 वर पोहोचला

टॉप 5

निफ्टीमध्ये 1.27 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,012 अंकांवर पोहोचला

टॉप 6

निफ्टी बँकमध्येही आज 317 अंकांची वाढ होऊन तो 41,307 अंकांवर स्थिरावला.

टॉप 7

शेअर बाजारात आज एकूण 1788 शेअर्समध्ये वाढ झाली. तर 1657 शेअर्समध्ये घसरण झाली.

टॉप 8

आज एकूण 164 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.

टॉप 9

शेअर बाजारात आज जवळपास सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं

टॉप 10

बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये एका टक्क्याची तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 0.5 टक्क्याची वाढ नोंद झाली आहे.