दिवसभरात शेअर बाजारात (Share Market Updates) आज अस्थिरता दिसून आली
गुंतवणूकदारांकडून खरेदीचा ओघ सुरू असताना दुसरीकडे नफावसुलीदेखील झाली.
आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी बाजार बंद होताना तेजी दिसून आली
शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स (Sensex) 200 अंकांनी वधारला. तर, निफ्टी (Nifty) 17800 च्या पातळीजवळ स्थिरावला.
बई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 203 अंकांच्या तेजीसह 59,959 अंकांवर स्थिरावला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 49.85 अंकांनी वधारत 17,786 अंकांवर स्थिरावला.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 20 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली, 10 शेअर दरात घसरण
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीतील 50 कंपन्यांपैकी 30 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली
19 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली
एका कंपनीच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही