दिवाळीच्या निमित्ताने ग्राहक सोनं खरेदी करतात. याच पार्श्वभूमीवर ग्राहकांना सोनं-चांदी खरेदीसाठी चांगली संधी आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) सतत घट होताना पाहायला मिळतेय. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील डॉलरची किंमत कमी झाल्यामुळे भारतीय बाजारावर त्याचा परिणाम झाला आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 50,270 रूपयांवर आला आहे. सोन्या-चांदीच्या किंमती मुंबई-पुण्यात सारख्याच आहेत. दिल्लीत देखील सोन्याचा दर कमी आहे. या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 50,180 रूपये आहे. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.