आज भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस अतिशय निराशाजनक राहिला
जागतिक शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे बाजारात नफावसुली दिसून आली
आज दिवसभरातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 390 अंकांची घसरण दिसून आली
तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 109 अंकांची घसरण
दिवसअखेर सेन्सेक्स 57,235 अंकांवर स्थिरावला तर, निफ्टी 17,014 अंकांवर बंद झाला
बाजारात आज झालेल्या व्यवहारात एकूण 3562 कंपन्यांपैकी 1309 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली
तर, 2119 शेअर दरात घसरण नोंदवण्यात आली.
134 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही
आज दिवसभरातील व्यवहारात 200 कंपन्यांच्या शेअर दराने अप्पर सर्किट गाठला
180 कंपन्यांचे शेअर दर लोअर सर्किटसह बंद झाले