मंगळवारी झालेल्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात सकारात्मकपणे झाली
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 57,312 अंकांवर खुला
निफ्टी निर्देशांक 17,025.55 अंकांवर खुला झाला
बाजारात खरेदीचे संकेत दिसून येत असले तरी बाजार अस्थिर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
न्सेक्स 270 अंकांनी वधारत 57,419.26 अंकांवर व्यवहार करत आहे
निफ्टी निर्देशांक 80 अंकांच्या तेजीसह 17,063.70 अंकांवर व्यवहार करत आहे.
आशियाई शेअर बाजारात घसरण दिसून आली
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने 2023 या वर्षासाठी जागतिक अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर 2.7 टक्के इतका केला आहे
आधीच्या अंदाजापेक्षा हा अंदाज कमी आहे. त्याचा परिणाम आशियाई शेअर बाजारावर दिसून आला
अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक डाउ जोन्स निर्देशांक 36 अंकांनी वधारत 29,239 अंकावर स्थिरावला