टॉप 1

शेअर बाजारात आजच्या व्यवहाराची सावध सुरुवात झाली आहे

टॉप 2

शेअर बाजारात सुरुवातीला किंचित तेजी दिसून आली

टॉप 3

त्यानंतर विक्रीच्या दबावाने बाजारात घसरण सुरू झाली. एसजीएक्स निफ्टी मध्ये घसरण दिसत होती

टॉप 4

आज बाजाराची सुरुवात जवळपास सपाट झाली आहे

टॉप 5

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 13.14 अंकांनी वधारत 58,004 अंकांवर वधारला

टॉप 6

तर, निफ्टी (Nifty) 15 अंकांनी वधारत 17,256 अंकांवर खुला झाला

टॉप 7

सकाळी 9.32 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 133 अंकांच्या घसरणीसह 57,824.39 अंकांवर व्यवहार करत होता

टॉप 8

निफ्टी 39 अंकांच्या घसरणीसह 17,200.05 अंकावर व्यवहार करत होता

टॉप 9

सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 14 कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसत असून 16 कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण दिसत आहे

टॉप 10

निफ्टीतील 50 मधील 17 शेअर्समध्ये तेजी दिसत असून 33 शेअरमध्ये घसरण दिसत आहे