दोन दिवसांच्या पडझडीनंतर बुधवारी भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली
गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर दिसल्याने बाजार वधारला.
आज दिवसभरातील व्यवहारात बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली
मधल्या काही वेळेत बाजारात घसरण दिसून आली होती. मात्र, दुपारनंतर बाजारात खरेदीचा ओघ वाढला.
आज बाजार बंद झाला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 478 अंकांच्या तेजीसह 57,625 अंकांवर बंद झाला
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत 140 अंकांची तेजी दिसून आली
निफ्टी 17123 अंकांवर बंद झाला.
आज शेअर बाजारा मीडिया वगळता इतर क्षेत्रात खरेदीचा जोर दिसून आला
स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्येही तेजी दिसून आली
निफ्टी 50 मधील 43 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली