आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण झाली आहे
शेअर बाजारातील आजचा दिवस चांगलाच अस्थिर असल्याचं दिसून आलं
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) 200 अंकांची घसरण झाली आहे
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 73 अंकांची घसरण झाली आहे
सेन्सेक्समध्ये 0.34 टक्क्यांची घसरण झाली असून तो 57,991.11 अंकावर स्थिरावला
निफ्टीमध्ये 0.43 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,241 अंकावर पोहोचला
बँक निफ्टीमध्येही 84 अंकांची घसरण होऊन तो 39,093 अंकावर पोहोचला
सकाळच्या सत्रात शेअर बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली
आज आयटी क्षेत्र सोडलं तर इतर क्षेत्रातल्या शेअर्समध्ये काहीशी घसरण
बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 0.5 टक्क्यांची घसरण झाली आहे