आज जर सोन्याचे दर पाहिले तर सोन्याच्या दरात 500 रूपयांची वाढ झाली आहे.



चांदीच्या दरात तब्बल हजार रूपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना सोने खरेदी करणं आज महागात पडू शकतं.



आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.50 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52,950 रूपयांवर आला आहे.



चांदीचा दर तर तब्बल एक हजारांनी वाढला आहे. आज चांदीचा दर 62,830 रुपये आहे.



सोन्याचे हे दर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, या शहरांसह अन्य ठिकाणीही सारखेच आहेत.



लग्नसराईच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांना महागाईचा फटका बसू शकतो.



BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.



यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.



ग्राहकांना जर आजचे सोन्याची खरेदी करायची असेल तर आजचे दर पाहा आणि नंतरच खरेदी करा.