भारतीय शेअर बाजारातील आजचे व्यवहार घसरणीसह बंद झाले.
आठवड्यातील पहिल्या दिवशी बाजारात विक्रीचा सपाटा दिसून आला
सकाळी बँक निफ्टीत (Bank Nifty) तेजी दिसून आली होती. मात्र, त्यानंतर घसरण दिसून आली.
आज दिवसभरातील व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 170.89 अंकांच्या घसरणीसह 61,624.15 अंकांवर बंद झाला
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 20.55 अंकांच्या घसरणीसह 18,329.15 अंकांवर स्थिरावला.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 कंपन्यांपैकी 16 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली
14 कंपन्याच्या शेअर दरात घसरण नोंदवण्यात आली.
निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 26 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली
तर, 24 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली.
निफ्टीतील सेक्टोरियल इंडेक्समध्ये ऑटो, आयटी, मेटल, फार्मा, रियल्टी, हेल्थकेअर, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमध्ये खरेदीचा जोर दिसून आला.