भारतीय शेअर बाजारासाठी (Indian Share Market) आजचा दिवस चांगलाच ठरला
Monthly Expiry च्या दिवशी बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली होती.
त्यानंतर बाजारात खरेदीचा ओघ वाढल्याने सेन्सेक्स (BSE Sensex) आणि निफ्टी (NSE Nifty) निर्देशांकात तेजी दिसून आली
बँकिंग (Bank Nifty) आणि आयटी सेक्टरमध्ये (Nifty IT) खरेदीचा जोर दिसून आला.
आज बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 223 अंकांनी वधारत 61,133.88 अंकांवर स्थिरावला.
निफ्टी निर्देशांक 68.50 अंकांनी वधारत 18,191.00 अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 19 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली
11 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली.
निफ्टी 50 निर्देशांकातील 33 शेअरमध्ये खरेदीचा उत्साह दिसला
17 कंपन्यांच्या शेअरमध्ये विक्रीचा जोर दिसून आला