इंडियन बुलियन्स असोसिएशनच्या संकेतस्थळानुसार, आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.



सोन्याच्या किंमतीत तब्बल 200 रुपयांची वाढ झाली आहे. तर कालच्या तुलनेत चांदी स्थिर आहे.



आज सोने-चांदीची किंमत पाहता 22 कॅरेटसाठी सोन्याची किंमत 50,300 रुपये प्रति तोळा आहे



तर 24 कॅरेटसाठी सोन्याची आजची किंमत अंदाजे 54,860 रुपये प्रती तोळा आहे.



चांदीच्या किंमती आज अंदाजे 72,300 रुपये प्रती किलो आहेत. 



मुंबईतील सोने-चांदीचा भाव - 22 कॅरेट (रु.प्रती तोळा) 50150, 24 कॅरेट (रु.प्रती तोळा) 54710, तर चांदी (रु.प्रती किलो) 72300 आहे.



पुणे सोने-चांदीचा भाव - 22 कॅरेट (रु.प्रती तोळा) 50150, 24 कॅरेट (रु.प्रती तोळा) 54710, तर चांदी (रु.प्रती किलो) 72300 आहे.



नवी दिल्लीतील सोने-चांदीचा भाव - 22 कॅरेट (रु.प्रती तोळा) 50300, 24 कॅरेट (रु.प्रती तोळा) 54860, तर चांदी (रु.प्रती किलो) 72300 आहे.



चेन्नईतील सोने-चांदीचा भाव - 22 कॅरेट (रु.प्रती तोळा) 51050, 24 कॅरेट (रु.प्रती तोळा) 55690, तर चांदी (रु.प्रती किलो) 74600 आहे.



तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा.



BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता.