लग्नसराईत सोन्याचे दर महागल्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदी करताना अडचण येत होती. मात्र, आज सोन्याचे दर स्थिर आहेत.

गेल्या काही दिवसांत जागतिक बाजारातील डॉलरचे वाढलेले दर तसेच चीनमधील कोरोनाचा वाढता संसर्ग याचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किंमतीवर झाला.

काही दिवसांपूर्वी सोन्याचे दर 56 हजारांपर्यतं पोहोचले होते. एकूण आकडेवारी पाहता मागच्या पाच महिन्यांतील सोन्याच्या दराने सर्वात मोठी उच्चांक पातळी गाठली होती.

त्यामुळे लग्नसराईत ग्राहकांनादेखील सोनं खरेदी करताना मुरड घालावी लागत होती. मात्र, आज सोन्याचे दर पाहता ग्राहकांना किंचित दिलासा मिळणार आहे.

कारण आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 54,800 रूपयांवर आला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचे दर 50,233 वर व्यवहार करत आहेत.

आज एक किलो चांदीचा दर 68,860 रुपयांवर व्यवहार करत आहे.

स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% वाढून $1,785.78 प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.7% कमी होऊन $1,796.50 वर होते.

स्पॉट सिल्व्हर 0.9% कमी होऊन $23.44 वर, प्लॅटिनम 0.4% कमी होऊन $1,005.88 वर आणि पॅलेडियम 0.1% कमी होऊन $1,889.50 वर पोहोचले आहेत.

इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.