आर्थिक वर्षांच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली. जागतिक बाजारातील चांगल्या संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार व्यवहार सुरू होते. बाजार उघडताच सेन्सेक्स 58500 च्या वर व्यवहार करत होता. निफ्टीनं 17250 चा आकडा पार केला. आज सेन्सेक्स 674 अंकांनी वधारला. निफ्टी 184 अंकांनी वर गेला आहे. अमेरीकेतील बाजारात तेजी बघायला मिळाल्यानं भारतीय शेअर बाजारात वृद्धी झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 22 पैशांनी मजबूतीसह 82.12 वर उघडला आहे. आज शेअर मार्केटमध्ये अदानी एन्टरप्रायझेज, अदानी पोर्ट, एचडीएफसी बॅंकसारख्या कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत. सेन्सेक्समधील 30 पैकी 28 कंपन्यांचे शेअर्स तेजीत आहेत.