आज देशभरात रामनवमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) कमोडिटी मार्केट आणि करन्सी मार्केट यावेळी बंद राहणार आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) संध्याकाळी 5 नंतर उघडेल. यानंतर संध्याकाळच्या सत्रात सोन्याचे (Gold) व्यवहार होतील. आज म्हणजेच 30 मार्च 2023 रोजी रामनवमीच्या सुट्टीमुळे शेअर बाजारातील व्यवहार बंद आहेत. या व्यतिरिक्त एप्रिल महिन्यामध्ये विविध सणानिमित्त तीन दिवस मार्केट बंद राहील. पुढील आठवड्यातही दोन दिवस शेअर बाजार कोणत्याही ट्रेडिंग शिवाय बंद असेल. NSE आणि BSE 4 एप्रिल आणि 7 एप्रिल रोजी सणानिमित्त सुट्टी असून बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही. 4 एप्रिलला महावीर जयंती आणि 7 एप्रिलला गुड फ्रायडे असल्याने शेअर बाजारात कोणतीही ट्रेडिंग होणार नाही. तसेच 14 एप्रिल रोजी डॉ. भीमराव आंबेडकर जयंतीनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे.