आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आता कच्चं तेल प्रति बॅरल 80 डॉलरच्या आसपास पोहोचलं आहे. अमेरिकेत SVB आणि सिग्नेचर बँक बुडल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतींत मोठी घसरण झाली होती. तसेच, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 70 डॉलरच्या खाली पोहोचलं होतं. आज आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ किंवा घट झालेली नाही. कच्च्या तेलाच्या किमतींत सतत चढ-उतार होत असताना देशात पेट्रोल-डिझेल स्थिर आहे. आज देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरनं मिळतंय. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत एक लिटर पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.