आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढू लागल्यात.

सलग तिसऱ्या दिवशी कच्च्या तेलाच्या दरांत वाढ नोंदवण्यात आली आहे.

ब्रेंट क्रूड आता 80 डॉलरच्या आसपास पोहोचलं आहे.

WTI क्रूड ऑईल प्रति बॅरल 73.80 डॉलर्सच्या आसपास व्यवहार करत आहे.

देशातील तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केलेत.

आजही देशातील सर्वच महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये, तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर पोहोचलंय.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलची किंमत 106.31 रुपये आहे, तर डिझेलची किंमत 94.27 रुपये प्रति लिटर आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर 102.63 रुपये आणि 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

कोलकात्यात पेट्रोल आणि डिझेलची किंमत 106.03 रुपये प्रति लिटर आणि 92.76 रुपये प्रति लिटर आहे.