शेअर बाजारात तेजी; निफ्टी 17,000 पार, तर सेन्सेक्सनं ओलांडला 57800 चा टप्पा आज शेअर बाजाराची सुरुवात संमिश्र झाली, पण त्यानंतर बाजारात तेजी दिसून आली. सुरुवातीच्या काही मिनिटांतच सेन्सेक्सनं 57800 चा टप्पा ओलांडला. निफ्टीनंही बाजार उघडताच 17000 च्या वरची पातळी गाठली. आज, जवळपास सर्व सेक्टोरल इंडेक्समध्ये तेजी दिसतेय. आशियाई बाजारातही (Asian Market) तेजी पाहायला मिळत आहे. BSE चा 30 शेअर्सचा इंडेक्स सेन्सेक्स 41.64 अंकांच्या घसरणीसह 57,572.08 च्या पातळीवर उघडला. निफ्टीबद्दल बोलायचं झाल्यास, NSE चा 50 शेअर्सचा इंडेक्स निफ्टी 25.60 अंक म्हणजेच, 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 16,977.30 वर उघडला. आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 पैकी 24 शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत. NSE निफ्टीच्या 50 पैकी 39 शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. याशिवाय 10 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.