आज शेअर बाजाराची सपाट सुरुवात पाहायला मिळाली. त्यानंतर आता सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह व्यवहार करत आहेत.



सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 75 अंकांनी घसरल्याचे पाहायला मिळाले.



आज शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स 61294 वर आणि निफ्टी 18230 वर उघडला.



सुरुवातीच्या व्यवहारात बाजारात विक्रीचा दबाव आहे.



दबाव असूनही इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा आणि एसबीआय, हिंदुस्थान युनिलिव्हर या शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत.



टाटा स्टील, पॉवरग्रीड, इन्फोसिस आणि टाटा मोटर्स या शेअर्समध्ये घसरण झाली. टाटा स्टील, टाटा मोटर्स, इन्फोसिस शेअर्सवर गुंतवणुकदाराकडून विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.



मंगळवारी बंद झालेल्या अंकांवरच सेन्सेक्स आणि निफ्टी उघडला. गुंतवणूकदारांना कालच्या पातळीवरच व्यवसाय पाहायला मिळत आहे.



बाजारात फ्लॅट उघडल्यानंतर गुंतवणूकदारांनी विक्री सुरू केली आणि शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली.



मागील दोन दिवस शेअर बाजारा घसरणीसह सुरु होऊनही तेजीसह बंद झाल्याचं पाहायला मिळालं. आता आज काय होतं हे पाहावं लागेल.