नव्या वर्षातील पहिल्याच दिवशी बाजारात खरेदीचा जोर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 327 अंकांच्या तेजीसह 61,168 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 92 अंकांच्या तेजीसह 18,197 अंकांवर बंद झाला. डॉलरच्या तुलनेत रुपया 82.74 वर स्थिरावला. आज दिवसभरातील व्यवहारात मेटल्स स्टॉकमध्ये तेजी दिसून आली. फार्मा, हेल्थकेअर आणि ग्राहकोपयोगी वस्तू सेक्टरच्या शेअर दरात घसरण दिसून आली. मेटल्स स्टॉक्समध्ये जवळपास तीन टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, रिअल्टीच्या शेअर्समध्ये एक टक्क्यांची तेजी दिसली. निफ्टी निर्देशांकात टाटा स्टील, हिंदाल्को, ओएनजीसी, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर दरात तेजी दिसली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल 283.85 लाख कोटी रुपये झाले.