वीन वर्षाच्या सुरुवातीलाच गॅस सिलेंडरबरोबरच सोन्या-चांदीच्या किंमतीतही वाढ होताना दिसली. आज 4 जानेवारी 2023 रोजी सोने-चांदीचे दर पाहता आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत किरकोळ वाढ दिसत आहे. तर चांदीचे भाव मात्र स्थिर आहेत. इंडियन बुलियन्स असोसिएशनच्या संकेतस्थळानुसार, 22 कॅरेटसाठी सोन्याची किंमत 51,110 रुपये प्रति तोळा आहे. 24 कॅरेटसाठी सोन्याची आजची किंमत 55,740 रुपये प्रती तोळा नोंदवण्यात आली आहे. सराफा बाजारात आज बुधवारी चांदीच्या किंमती 72,000 रुपये प्रती किलोंच्या घरात आहेत. मंगळवारी सोन्याची किंमत पाहता 22 कॅरेटसाठी 51,100 रुपये प्रती तोळा नोंदवण्यात आली होती तर 24 कॅरेटसाठी काल 55,730 रुपये प्रती तोळा होती. कालच्या तुलनेत आज निव्वळ 10 रुपयांची वाढ झाली आहे. भारतात ऐन लग्नसराईचा काळ सुरु आहे. त्यातच नव्या वर्षातच सोन्याचे दर वाढल्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदी करताना मुरड घालावी लागतेय.